Gold Price Today | खुशखबर ! सणापूर्वी कमी झाला सोन्याचा दर, सर्वोच्च स्तरापासून मिळतंय 10582 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 6 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीचा कल होता. यामुळे सोने आपल्या स्तरापासून 10,500 रुपयांपेक्षा जास्त खाली राहात 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली कायम राहीले. तर, चांदीच्या दरात (Silver Price Today) सुद्धा आज घट नोंदली गेली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,844 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदी मंगळवारी 59,803 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही. (Gold Price Today)

सोन्याचे नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 226 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली.
दिल्ली 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 45,618 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
सध्या सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 10,582 रुपये स्वस्त मिळत आहे. कारण ऑगस्ट 2020 मध्ये त्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.

अशावेळी सणापूर्वी सोने खरेदीची चांगली संधी आली आहे.
अंतराराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि ते 1,747 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

 

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घसरण पहायला मिळाली.
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 462 रुपयांच्या घसरणीसह 59,341 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 22.35 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Web Title :- Gold Price Today | gold price reduced today and you can buy cheaper by rs 10582 check new prices of 10 grams gold

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | अजित पवारांनी ‘जरांडेश्वर’च्या मालकाचे नाव घोषित करावे, किरट सोमय्यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 117 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | ॲमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटीचा ‘भ्रष्टाचार’ ! भाजपचा पर्दाफाश करा; काँग्रेसजनांनो एकदिलाने महापालिका निवडणूक लढवा – काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (Video)