Gold Price Today | सोने महाग-चांदी स्वस्त, जन्माष्टमीला खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आज कितीवर पोहोचला सोन्याचा दर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | ग्लोबल मार्केटमध्ये घसरण होऊनही आज देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, आज सकाळपासूनच चांदीवर दबाव होता आणि तिचा भाव 57 हजारांच्या खाली आला. (Gold Price Today)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदा भाव 149 रुपयांनी वाढून 51,652 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,644 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने त्याचा भाव लवकरच 51,700 रुपयांच्या जवळ पोहोचला. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.29 टक्क्यांनी वाढले आहे.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

आज सकाळी चांदीच्या दरात घसरण दिसत आहे. MCX वर, चांदीचा वायदा भाव 155 रुपयांनी घसरून 56,760 रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी, चांदी व्यवहार 56,655 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने लवकरच तिचा भाव 56,700 च्या वर गेला. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.27 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे.

 

ग्लोबल मार्केटमध्येही वाढले भाव

आज ग्लोबल मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे आणि अमेरिकन बाजारात सोन्याचा हाजीर भाव 1,7638.22 प्रति औंस होता, जो मागील बंद किंमतीपेक्षा 0.10 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा हाजीर भाव देखील मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.75 टक्क्यांनी घसरून 19.68 डॉलर प्रति औंस झाला आहे. सोने-चांदीच्या दरात एक दिवस आधी वाढ दिसून येत होती, तर मंगळवारी सोने 573 रुपयांनी आणि चांदी 1300 रुपयांनी स्वस्त झाली.

 

पुढे कसा राहील बाजार ?

कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया सांगतात की, सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.
जागतिक बाजारपेठेत होणार्‍या सुधारणांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येईल.
आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून त्याची मागणी वाढतच जाणार आहे.
त्यामुळे सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. डॉलरचे अवमूल्यन होत असताना सोने-चांदीचे भाव वाढतील.
या वर्षाअखेरीस सोने 54 हजारांच्या पातळीवर पोहोचू शकेल, असा अंदाज आहे.

 

Web Title : –  Gold Price Today | gold price rise today but silver tumbled check 10 gram latest rate here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा