Gold Price Today | ‘या’ आठवड्यात 1200 रुपयांनी महागले सोने, चांदी 58 हजारच्या पुढे, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील वाढीमुळे शुक्रवारी सकाळी चांदीच्या वायदा भावात 400 रुपयांहून अधिक उसळी दिसून आली आणि तिची किंमत 58 हजारांच्या पुढे गेली, तर सोन्याचा भाव या आठवड्यात 1,200 रुपयांनी वाढून 51 हजारांच्या वर गेला. (Gold Price Today)

 

आजचा सोन्याचा दर (Gold Price Today)

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वायदा भाव 96 रुपयांनी वाढून 51,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याआधी सोन्याचा व्यवहार 51,490 रुपयांवर सुरू झाला होता, परंतु मागणी कमी झाल्याने किमती थोड्या कमी झाल्या. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.19 टक्क्यांनी वाढले आहे.

 

आज चांदीमध्ये जोरदार उसळी (Silver Price Today)

सोन्याच्या धर्तीवर आज चांदीच्या दरातही उसळी दिसून आली आणि तिचा भाव 58 हजारांच्या पुढे गेला. एमसीएक्सवर सकाळी चांदीचा भाव 418 रुपयांनी वाढून 58,037 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 57,830 रुपयांवर सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने किमतीत तेजी दिसून आली. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.73 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.

 

ग्लोबल मार्केटमध्ये काय आहे भाव

आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याचा हाजीर भाव 1,762.02 डॉलर प्रति औंसवर पोहोचला, जो मागील बंद किंमतीपेक्षा 0.36 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, चांदीचा हाजीर भाव आज 20.08 डॉलर प्रति औंस आहे, जो मागील बंद किंमतीपेक्षा 0.62 टक्के जास्त आहे. यामुळेच आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

 

सोन्यामध्ये सतत वाढ

सध्या सोन्यावर दबाव असला तरी तो हळूहळू संपुष्टात येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या आठवड्यात सोन्याची किंमत वायदा बाजारातच प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,200 रुपयांनी वाढली आहे.
महागाई आणि मंदीचा धोका कमी होताच सोन्याला पुन्हा एकदा तेजी येईल.
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, या वर्षाच्या अखेरीस सोने 54 हजारांची पातळी गाठू शकते.

 

Web Title : –  Gold Price Today | gold price surge to cross 51 thousand mark again silver gain over 400 rupee

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा