Advt.

Gold Price Today | सोन्यात किरकोळ तेजी, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | लग्नसराई सुरू असूनही सोन्याच्या दरात (Gold Price Today) काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू होती, मात्र आज तेजी दिसून आली आहे. तर, चांदीचा दर (Silver price) आजही कमी झाला आहे. दिल्ली सराफा बाजारात 6 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात 29 रुपयांची किरकोळ तेजी नोंदली गेली. याशिवाय चांदीच्या दरात (Silver Price Today) आज 149 रुपयांची घसरण झाली.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,945 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 60,286 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने घसरून व्यवहार करत होते, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 29 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी आली. यामुळे राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,974 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घट झाली आणि ते 1,781 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

चांदीचा आजचा दर (Silver price)
चांदीच्या दरात आज घसरण नोंदली गेली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीच्या दरात 149 रुपयांची किरकोळ घट झाल्यानंतर सुद्धा चांदी 60 हजार रुपये प्रति किग्रॅच्या वर कायम होती.
राष्ट्रीय राजधानीत आज चांदीचा दर 60,137 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजरात आज चांदीचा 22.38 डॉलर प्रति औंसवर स्थिर होता.

 

सोन्याच्या दरात का आली तेजी?
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
आज कॉमेक्सवर (COMEX) सोन्याच्या हाजीर भावात (Spot Gold Prices) घसरण नोंदली गेली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सतत सुरू असलेल्या उलथा-पालथी दरम्यान भारतीय बाजरात आज सोन्याच्या दरात किरकोळ तेजी नोंदली गेली.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 06 december 2021 gold rate jumps silver rate dip check latest price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

PPF Account | पीपीएफ खाते दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करणे आता झाले आणखी सोपे, या 5 स्टेपमध्ये करावे लागेल अप्लाय

Narayan Rane | नारायण राणेंचा खोचक टोला; म्हणाले – ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?’