Gold Price Today | 10 ग्रॅम गोल्डच्या रेटमध्ये आज पुन्हा झाली घसरण, जाणून घ्या किती स्वस्त झाले सोने?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरूच आहे, आज लागोपाठ सहाव्या दिवशी सोन्याचे भाव (Gold Price Today) घटले आहेत. सोबतच चांदीमध्ये सुद्धा किरकोळ घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी घसरणीसह (Gold Price Today) व्यवहार करत आहे. एमसीएक्सवर सोने 0.20 टक्केच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात 0.02 टक्केची घट झाली.

विक्रमी स्तरापासून अजूनही खुप स्वस्त
या घसरणीनंतर सोन्याचे भाव विक्रमी स्तरापासून खुप खाली आले आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता. तर एमसीएक्सनुसार आज सोने 47,541 रुपये प्रति 10 वर ट्रेड करत आहे. म्हणजे अजूनही सोने 8,500 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

येथे चेक करा सोने-चांदीचे ताजे भाव (Gold Price Today, 23 July 2021)
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत आज 0.20 टक्केच्या घसरणीसह 47,541 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.
याशिवाय चांदीच्या किंमतीत सुद्धा किरकोळ घट दिसून येत आहे.
आजच्या व्यवहारात चांदीची किंमत 0.02 टक्के कमी होऊन 67,360 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर आली.

Web Title :- gold price today 23 july 2021 gold down by rs 8500 from record high check 10 gram price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण