Gold Price Today | रू. 47,600 झाला 10 ग्रॅम सोन्याचा भाव, जाणून घ्या चांदीचा काय आहे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात तेजी असूनही सोने अजूनही सर्वोच्च स्तरापासून अतिशय स्वस्त मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज पुन्हा सोन्याच्या दरात (Gold Price Today) तेजी दिसून येत आहे. तर चांदीचा दरही आज वाढला आहे. आज एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात (Sonyacha bhav) 0.11 टक्के तेजी आली आहे. तर, चांदीच्या किमतीत (Silver price) 0.07 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे.

 

आज 48 हजारपेक्षा कमी सोन्याचा दर
एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्याचा दर आज 0.11 टक्के तेजीसह 47,636 रुपये प्रती 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदीही तेजीत आहे. आज 1 किलो चांदीचा दर 0.07 टक्केच्या वाढीसह 61,079 रुपयांवर पोहोचला आहे.

 

2020 मध्ये 56 हजारच्या पुढे गेले होते Gold
ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने फेब्रुवारी वायदा एमसीएक्सवर 47,636 रुपये प्रती 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सुमारे 8,564 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे. (Gold Price Today)

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते.
यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 31 jan 2022 rs 47600 per 10 gram check silver rate today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा