Gold Price Today | 7 हजारपर्यंत ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, आता खरेदी केल्यास मिळेल मोठा फायदा; एक्सपर्ट देताहेत सल्ला

नवी दिल्ली : Gold Price Today | जर सोने खरेदी करायचे असेल तर सध्या सुवर्णसंधी आहे. गुंतवणुकीच्या हिशेबाने सुद्धा आता सोने खरेदी करणे नफा देऊ शकते. सोन्यात पुन्हा एकदा जोश वाढताना दिसत आहे. आज जुलैच्या शेवटच्या दिवशी (30 जुलै) शुक्रवारी सोने-चांदी (Gold-Silver Rate Today) च्या भावात पुन्हा वाढ दिसून आली.

कॉमेक्सवर सोने (Gold rate) सुमारे 6 आठवड्याच्या वरील स्तरावर आहे. तर एमसीएक्सवर दर पुन्हा 48,000 च्या पुढे गेले आहे. मात्र, तरीसुद्धा सोने आपल्या ऑलटाइम हाय 5,6254 रुपयांपासून सुमारे 7,831 रुपये स्वस्त आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने आपल्या ऑल टाइम हाय लेव्हलवर होते. डॉलरमध्ये कमजोरी आणि फेडरल रिझर्व्हचा नरम कल यामुळे सोन्याला सपोर्ट मिळाला आहे.

सोन्याच्या चढ-उतारावर लक्ष

कॉमेक्सवर सोने 6 आठवड्याच्या वरील स्तराजवळ व्यवहार करत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 48,300 च्या वर गेला आहे. डॉलरमध्ये नरमाई, फेडरल रिझर्व्हच्या कलामुळे सोन्याला आधार
मिळत आहे. दुसर्‍या सहामाहीत भारताची मागणी वाढण्याची आशा आहे. पहिल्या सहामाहीत
भारताची मागणी 5 वर्षाच्या सरासरीपासून 35% कमी राहिली. मार्केट एक्सपर्ट सोन्यात
गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य सांगत आहेत, कारण दिवाळीपर्यंत सोने आणखी महाग होईल. अशावेळी गुंतवणुकदारांना फायदा होईल.

चांदीत सुस्ती

शुक्रवारी चांदी 232 रुपये प्रति किलो वाढून 68113 रुपयांवर पोहचली. तर सराफा बाजारात
सोन्याचा हाजीर भाव 65 रुपये महाग होऊन 48423 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचला. मात्र, तरीही
सोने आपल्या ऑल टाइम हाय 56254 रुपयांपासून सुमारे 7831 रुपये स्वस्त आहे. मागील वर्षी
ऑगस्ट महिन्यात सोन्याने आपल्या ऑल टाइम हाय लेबलला स्पर्श केला होता.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणेकरांना तुर्तास दिलासा नाहीच? महापालिकेचा सुधारित आदेश जारी

Pune News | ‘सेव्ह अवर एन्व्हायर्नमेंट ‘विषयावर भित्तीपत्रक स्पर्धा

Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Today | gold price today 31 july gold fall down by 7k rupees of record level check latest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update