Gold Price Today | सोने झाले महाग, चांदीची किंमतही वाढली; जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 5 जानेवारी 2022 ला सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. तर, चांदीच्या किंमतीत उसळी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 154 रुपयांची तेजी नोंदली गेली. तर, चांदीच्या किंमतीत आज 352 रुपयांची वाढ नोंदली गेली. (Gold Price Today)

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा दर 154 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 46,969 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

चांदीच्या दरात सुद्धा आज तेजी नोंदली गेली आणि ती 60 हजार रुपये प्रति किग्रॅच्या वर राहिली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 352 रुपयांच्या तेजीनंतर 60,725 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदी 60,373 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.

 

Web Title :-  Gold Price Today | gold price today 5 january 2022 gold silver rate check latest sonyache dar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा