Gold Price Today | खुशखबर! सोने-चांदीच्या किमतीमध्ये कमालीची घसरण, विक्रमी स्तरापासून मिळतेय 8000 रूपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज गुरुवारी घसरण दिसून येत आहे. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने फेब्रुवारी वायदा किमतीत (Gold price today) 0.10 टक्केची घसरण आहे. या घसरणीसह आज 10 ग्रॅम सोने 48,007 रुपयांवर पोहचले आहे. तर, चांदीची किंमत (Silver price today) कमी झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 0.05 टक्के घसरला आहे. या घसरणीनंतर चांदी 61,593 रुपयावर आली आहे.

 

8,000 रुपये स्वस्त मिळत आहे सोने
लग्नसराई सुरू असल्याने सोन्याला खूप मागणी आहे. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने मागील वर्षानुसार यावर्षी 8000 रुपये स्वस्त मिळत आहे. अशावेळी सोने खरेदी करणे तुमच्यासाठी लाभदायक आहे. तर, गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. जाणकारांनुसार, लवकरच सोने महाग होईल आणि गुंतवणुकदारांना मोठा रिटर्न मिळू शकतो. (Gold Price Today)

 

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

 

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today 9 december 2021 gold silver rate fall sona rs 8000 down from record level

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत

Anti Corruption Bureau Mumbai | गेट जामीन करण्यासाठी लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक (PSI) एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime | ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’खाली ‘सिद्धीविनायक’च्या राजेश साकला आणि वृषभ साकला यांच्यावर गुन्हा दाखल; 12 वर्षानंतरही नाही केले ‘हस्तातंरण’