Gold Price Today | वाढीनंतर सुद्धा सोने 45 हजार रुपयांच्या जवळ, चांदी झाली महाग; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज म्हणजे 29 सप्टेंबर 2021 ला तेजी नोंदली गेली. यानंतर सुद्धा सोने 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ आहे. तर, चांदीच्या दरात (Silver Price Today) आज सुद्धा वाढ नोंदली गेली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 44,859 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 58,463 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात तेजी आली, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 264 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ नोंदली गेली. राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याच्या दरात आज 45,123 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली आणि ती 1,739 डॉलर प्रति औंस वर पोहचली.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या किमतीत आजही तेजीचा कल दिसून आला.
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीच्या दरात 362 रुपयांच्या वाढीसह 58,862 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 22.26 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की,
फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 74.19 च्या स्तरावर व्यवहार करत होता.
यामुळे सोन्याच्या दरात तेजीचा कल होता. तर, 7 आठवड्याच्या खालच्या स्तरावर पोहचल्यानंतर सोन्याच्या किमतीत सुधारणा झाली.

Web Title :- Gold Price Today | gold price today climbs and silver prices jumps on 29 september 2021 gold price latest news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | परदेशी चलनाच्या आमिषाने तरुणाला 3 लाखांचा गंडा; केलं ‘हे’ कृत्य

Gold Scheme | खुशखबर ! फक्त 100 रूपयांमध्ये विकलं जातंय सोनं, जाणून घ्या कसं खरेदी करू शकता एवढया कमी किंमतीत Gold

Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार