Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी वधारली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील काही दिवसापासून सोन्याच्या किंमती (Gold Price Today) घसरताना दिसत आहेत. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. त्याचप्रमाणे आजही (मंगळवारी) सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 45,261 रुपये प्रति तोळावर होता. तसेच, चांदीची किंमत (Silver) 58,710 रुपये प्रति किलोवर होती. या दोन्हीत देखील बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price Today)
आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या किरकोळ घसरणीनंतर सोन्याचा दर 1,761 डॉलर प्रति औंस आहे. तसेच, आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात 3 रुपयांनी झाली आहे. या किंचित घसरणीनंतर सोन्याचा भाव 45,258 रुपये प्रति तोळावर पोहचला आहे.

आजचा चांदीचा भाव – (Silver Price)
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत विशेष बदल झालेला नाही. ग्लोबल मार्केटमध्ये (Global Market) चांदीची किंमत 22.42 डॉलर प्रति औंसवर आहेत. आज (मंगळवारी) चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरात 40 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. यानंतर चांदीचा भाव 58,750 रुपये प्रति किलोवर आहे.

दरम्यान, फेडरल ओपन मार्केट कमिटीची दोन दिवसीय बैठक आज सुरू होणार आहे.
अशावेळी गुंतवणूकदार बैठकीच्या निर्णयाची आणि फेड अधिकाऱ्यांच्या निवेदनाची वाट पाहत आहेत.
आज सकाळी फॉरेक्‍स मार्केटमध्ये डॉलरच्या तुलनेत 15 पैशांच्या वाढीनंतर रुपया 73.59 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
अशी माहिती Senior Analyst at HDFC Securities (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली.

Web Titel :- Gold Price Today | gold price today dropped and silver gains check todays latest price of gold and sliver

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rains | राज्यात ‘धो-धो’ पाऊस ! मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’

Mayor Muralidhar Mohol | पुणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘पुण्यदशम’ने प्रवासादरम्यान ‘आधारकार्ड’ची सक्ती रद्द !

Sanjay Raut | ‘त्या’वेळी चंद्रकांत पाटील यांनाही तोंडाला फेस आला होता – संजय राऊत