Gold Price Today | सोनं मिळतंय 10000 रुपये ‘स्वस्त’, गुंतवणुकीची चांगली संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सतत घसरण सुरू आहे. आज म्हणजे 2 सप्टेंबर 2021 ला सुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत (Silver) उसळी दिसून आली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,221 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर, चांदी 62,371 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
भारतीय बाजारांच्या उलट अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर वाढले, तर चांदीत मोठा बदल झाला नाही.

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावात अवघी 28 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली. राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 46,193 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
यानुसार सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 10,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा दर किरकोळ वाढून 1,814 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

आज चांदीच्या किमतीत तेजीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर 279 रुपयांच्या वाढीसह 62,650 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि तो 24.17 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

सोन्यात का झाली घट

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, डॉलरच्या तुलनेत रुपयांत आलेल्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली जात आहे. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सोन्याच्या किमतीत सतत उलथा-पालथ सुरू आहे.
तर, भारतीय शेयर बाजारांत सुद्धा तेजीचा कल कायम होता. यामुळे सोन्याचे दर दबावात आहेत.

Web Title : Gold Price Today | gold price today dropped to rupees 10000 then peak investment opportunity 10 grams gold new prices

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! जर तुमच्याकडे सुद्धा असेल आहे ‘ही’ लिंक तर ताबडतोब करा डिलिट, बँकेने सांगितले ‘हे’ कारण?

Earn Money | अवघ्या 5 हजार रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल लाखो रूपयांची कमाई !