Gold Price Today | सोन्याचे दर कमी झाले, अजूनही गुंतवणुकीची चांगली संधी; जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीचा कल कायम आहे. आज म्हणजे 6 सप्टेंबर 2021 ला सुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली. तर, चांदीच्या किमतीत (Silver) आज वाढ नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,574 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 63,905 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचे दर कमी झाले, तर चांदीत विशेष बदल झाला नाही.

 

सोन्याचे नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात अवघी 71 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. या आधारावर सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 9,697 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये गोल्डने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर होते. या आधारावर अजूनही सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत कमी होऊन 1,826 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या दरात आज तेजीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचे दर 263 रुपयांच्या उसळीसह 64,168 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाले. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 24.78 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

सोन्यात का झाली घट

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, सोने सोमवारी दोन महिन्याच्या उच्चतम स्तरावर पोहचले.
तर, डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे गुंतवणुकदारांकडून सोन्यात नफा वसूलीसुद्धा केली गेली.
यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली जात आहे.
तसेच, भारतीय शेयर बाजारांमध्ये सुद्धा तेजीचा कल कायम आहे.
यामुळे सोन्याच्या किमती दबावात आहेत.

Web Title : Gold Price Today | gold price today dropped to rupees 9697 lower then peak investment opportunity check new prices of 10 grams gold

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bank Locker Rules | एखाद्या बँकेत नसेल अकाऊंट तरीसुद्धा मिळेल लॉकरची सुविधा, RBI ने नियमांमध्ये केला बदल; जाणून घ्या

Ram Shinde | अनिल देशमुख यांच्या ठावठिकाण्याबाबत भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंचा खळबळजनक दावा; म्हणाले…

Murder in Pimpri | प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून चाकूने केले सपासप वार