Gold Price Today | खुशखबर ! धनत्रयोदशीपूर्वी ‘स्वस्त’ झाले सोने; सर्वोच्च स्तरापासून आज 4 हजार रुपयांपर्यंत मिळतंय ‘स्वस्त’, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धनत्रयोदशी (dhanteras 2021) पूर्वी सोन्याच्या किमतीत (Gold price today) घसरण नोंदली गेली आहे. आज बुधवारी मल्टी कमोडिटी (MCX) वर सोन्याच्या दरात (Gold Price Today) 0.10 टक्केची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोने 47,765 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर, चांदीच्या किमतीत (Silver price today) तेजी पहायला मिळत आहे. MCX वर चांदी 0.09 टक्केच्या तेजीसह 65050 रुपयांवर ट्रेड करत आहे.

 

जर मागच्या वर्षी ऑक्टोबर 2020 च्या हिशेबाने पाहिले तर सध्या सोने अजूनही 4 हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे. मागच्या वर्षी आजच्या दिवशी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 51,079 रुपये होता आज सोने 47,765 रुपयांनी विकले जात आहे. म्हणजे अजूनही सर्वोच्च स्तरापासून सोने 3,314 रुपये स्वस्त विकले जात आहे. (Gold Price Today)

 

सोन्याचा दर पोहचणार 50,000 वर
सोन्याचा सध्याचा दर पाहता गुंतवणुकदार आणि खरेदीदारांमध्ये प्रश्न आहे की सध्या सोने खरेदी करावे किंवा नाही. तज्ज्ञांनुसार मागील काही काळापासून सोन्याच्या भावात सातत्याने तेजी कायम आहे. जर सोन्यात खरेदीबाबत अशीच धारण कायम राहिली तर सोन्याचा दर 50,000 रुपयांच्या स्तरावर पोहचू शकतो. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर सध्याच्या भावात खरेदी केली तर प्रति 10 ग्रॅमवर 2,500 रुपयांपेक्षा जास्त कमाई करता येऊ शकते.

सोन्याच्या किमतीत का आली तेजी?
डॉलरमध्ये आलेल्या कमजोरीमुळे अलिकडे सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदली गेली आहे. तसेच सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मागणी वाढण्याच्या शक्यतेचा सुद्धा परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसत आहे. अमेरिकन ट्रेझरी बाँडचे यील्ड वाढल्याने सुद्धा सोन्याच्या दराला समर्थन मिळत आहे. शिवाय, कच्च तेलाच्या दरात तेजीमुळे सुद्धा सोन्याला आधार मिळत आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today fall down before dhanteras you can buy 4k cheapest rate at gold check latest price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aadhaar Card | तुमचा सुद्धा बदलला असेल पत्ता तर अशाप्रकारे बदला, ‘या’ 21 कागदपत्रांचा करू शकता वापर; जाणून घ्या

Indian Railways | रेल्वेने दिला इशारा! प्रवासादरम्यान जर झाली ‘ही’ चूक, तर 3 वर्षासाठी जेलसह भरावा लागेल ‘दंड’

Maharashtra Covid Vaccination | महाराष्ट्राने केला विक्रम; 3 कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य

Amruta Fadnavis New Song | दिवाळीनिमित्त अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सोनू निगम ही सोबत गाणार

Mula Mutha Riverfront Development | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजना ! संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यातील कामाची 360 कोटीची निविदा प्रसिद्ध