Gold Price Today | खुशखबर ! 10,000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती सातत्याने उतरताना दिसत आहे. मागील चार दिवस सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर आजही सोन्याच्या दरात घट झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घटत आहेत. या घटत्या भावामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याच्या दरात घसरण होऊन 46,633 रुपये प्रति तोळावर पोहचला आहे. गतवर्षी सोन्याचा दर 56,000 रुपये होता. त्या तुलनेत सध्या सोनं 10000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.

सप्टेंबरच्या चांदीचा वायदा (Silver price) दर 0.71 टक्क्यानी वाढून 60,870 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचा भाव 0.7 टक्क्यानी तर चांदीचा दर .2 टक्क्यानी वाढला होता. दरम्यान, आज (बुधवारी) सोन्याचा भाव 46,330 रुपये प्रति तोळावर आहे. मंगळवारच्या दराच्या तुलनेत आज चांदीचा भाव 200 रुपयांनी कमी झाला आहे. या घसरणीने सध्या चांदीची किंमत 59,800 रुपये प्रति किलोग्रामवर पोहचली आहे.

दरम्यान, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

 

शहरातील (22 कॅरेट) सोन्याचा दर –

नवी दिल्ली –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,650 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,330 रुपये

चेन्नई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 43,740 रुपये

शहरातील (24 कॅरेट) सोन्याचा दर –

दिल्ली –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये

मुंबई –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 46,330 रुपये

 

Web Title : Gold Price Today | gold price today falls down by 10000 rs from record high check latest gold rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशन दुकानात वीज, पाण्याची बिले भरता येणार; PAN, पासपोर्टच्या अर्जाचीही सुविधा

Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

Anil Parab | अनिल परब यांच्याकडून दणका ! किरीट सोमय्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा