Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) चढ-उतार जारी आहे. अशावेळी जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.25 टक्केची घसरण नोंदली गेली. तर चांदीचा दर (Silver price) 0.21 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे.

7100 रुपयांनी स्वस्त विकले जातेय सोने

मागील वर्षी 2020 मध्ये समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने डिसेंबर वायदा एमसीएक्सवर 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे, म्हणजे आताही सुमारे 7109 रुपये स्वस्त मिळत आहे.

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा दर आज 0.25 टक्केची घसरणीसह 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.21 टक्के घसरली. आज 1 किलो चांदीचा दर 66,825 रुपये आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या.
पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold Price Today )

हे देखील वाचा

Retail Direct Scheme | पीएम मोदींनी लाँच केल्या RBI च्या 2 विशेष योजना, सामान्य माणसाला होईल थेट फायदा; जाणून घ्या

SSC – HSC Exam Fee Refund | विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! रद्द झालेल्या 10 वी, 12 वी परीक्षेचे शुल्क परत मिळणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | gold price today falls down rs 7100 from record high silver also drops check 22k gold rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update