Gold Price Today | सोने पुन्हा ‘स्वस्त’ ! सर्वोच्च स्तरापासून 10799 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज म्हणजे 23 सप्टेंबर 2021 ला पुन्हा घसरण नोंदली गेली आहे. यामुळे सोने 45,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली गेले आहे. तर, चांदीच्या दरात (Silver) आज वाढ दिसून आली. मागील व्यवहाराच्या सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने 45,685 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 59,583 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावात 294 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली. राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45 हजार रुपयांच्या खाली पोहचून 45,401 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

सोने 10,799 रुपयांनी स्वस्त
सोन्यात पुन्हा गुंतवणुकीची संधी आहे. कारण सोने आपल्या सर्वोच्च स्तरावपासून 10,799 रुपये स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली आणि ती 1,768 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
सोन्याच्या उलट आज चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली.
दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर 26 रुपयांच्या वाढीसह 59,609 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 22.78 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Web Titel :- Gold Price Today | gold price today fell rupees 10799 lower then record high check update prices and earn money

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 ऐवजी येतील 12000 रुपये, परंतु यांना मिळणार नाही फायदा

Pune News | ग्रामीण पोलिसांकडून सोमेश्वरनगर, पणदरे, मोरगाव, सुपे, वडगाव निंबाळकर येथे आयोजित महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Mumbai Crime | मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; प्रचंड खळबळ