Gold Price Today | सोने अजूनही सर्वोच्च स्तरापासून 9697 रुपयांनी ‘स्वस्त’, पहा 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत तेजीचे सत्र सूरू आहे. भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 21 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) किरकोळ तेजी आली. परंतु, अजूनही सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून (All-time High) खुप खाली विकले जात आहे. तर चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज तेजी नोंदली गेली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर, चांदी 63,698 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात तेजी आली, तर चांदीचा दर स्थिर (Gold Price Today) होता.

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या दरात 7 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी नोंदली गेली.
यामुळे राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला.

सोने 9,697 रुपयांनी अजूनही स्वस्त

मात्र, अजून सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे. कारण सोने अजूनही आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 9,697 रुपये प्रति 10 ग्रॅम खाली आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात उसळी नोंदली गेली आणि तो 1,783 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या दरात आज वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर अवघा 198 रुपयांच्या तेजीसह 63,896 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही आणि तो 24.18 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

Web Title : Gold Price Today | gold price today gains marginally still 9697 rupees cheaper then record high view details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jio-BP मुंबईच्या जवळ उघडणार पहिला Petrol Pump; 2025 पर्यंत 5,500 पेट्रोल पंप उघडण्याची योजना

The Big Picture | जान्हवी आणि साराने रणवीरच्या ‘शो’ मध्ये घातला धुमाकूळ, व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Gratuity Funds | PF खात्यावर आता किती मिळेल व्याज, 1 ऑक्टोबरपासून आले नवीन रेट; जाणून घ्या