Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मागील आठवड्यातील घसरणीनंतर आज दिसत आहे तेजी, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Today | आज आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आज सकाळी सोने एमसीएक्स (MCX) वर हिरव्या निशाणीत खुले झाल्यानंतर 50,449 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ट्रेड करत आहे. सोन्यामध्ये सध्या 81 रुपयांची म्हणजे 0.16 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या घसरणीनंतर या आठवड्याची सुरुवात तेजीने झाली आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत 198 रुपयांनी (0.37%) वाढून 53,220 रुपये प्रति किलोवर आहे. (Gold Price Today)

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात आयबीजीए (IBJA) च्या वेबसाइटनुसार, मागील व्यवहाराच्या आठवड्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोन्याचा (Gold) दर 51,265 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला.
त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा (Silver) भाव 54,316 रुपयांवरून 52,472 रुपये प्रति किलोवर आला. (Gold Price Today)

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचा दर तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
यानंतर फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीन दर पाहू शकता.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ’BIS Care app’द्वारे ग्राहक (Consumer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता, तसेच त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

Pune Pimpri Crime  | ‘तु मला खुप आवडतेस, तुझा मोबईल नंबर दे’ ! मिठी मारुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हिंजवडीमधील घटना

या अ‍ॅप (App) मध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (Gold) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवल्याची माहितीही लगेच मिळते.

Web Title :- Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest-rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cyrus Mistry Car Accident | अपघातात सायरस मिस्त्रींचा मृत्यू, मर्सिडीज चालवणार्‍या ‘अनाहिता पंडोले ‘ कोण आहेत?