Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या किंमतीत ‘तेजी’, जाणून घ्या आजचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी सुरूच आहे. सणासुदीच्या काळामुळे किमतीमध्ये पुढेही तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. 24 ऑक्टोबरला 22-कॅरेट सोन्याची किंमत 46,650 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर, 25 ऑक्टोबर म्हणजे आज 10 ग्रॅम 22-कॅरेट सोने 46,660 रुपयांना विकले जात आहे. जे कालच्या व्यवहाराच्या दरापेक्षा 10 रुपये जास्त (Gold Price Today) आहे.

 

याशिवाय चांदीच्या दराबाबत बोलायचे तर काल 24 ऑक्टोबरला चांदीच्या व्यवहाराचा भाव 65,600 प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर होता आणि आज त्याची किंमत वाढून 66,000 प्रति किलोग्रॅम झाली आहे. म्हणजे आज चांदीच्या किमतीत 400 रुपयांनी वाढली आहे. उत्पादन शुल्क (Excise Duty), राज्य कर (State taxes) आणि मेकिंग चार्जमुळे सोने-चांदीच्या दागिन्याची किंमत संपूर्ण भारतात वेगवेगळी (Gold Price Today) असते.

 

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किमत 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 66000 रुपये प्रति किलोवर आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोने 46,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66000 रुपये प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये सोने 47,010 रुपये आणि बेंगळुरुमध्ये 44,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today) 45,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today gold and silver prices rise in the festive season know what is going on today 25 oct 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 55 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aryan Khan Drugs Case | ‘मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, आर्यननेच फोन करण्याची विनंती केली होती’; माझ्या जीवाला धोका’, किरण गोसावीचा खुलासा