Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर वाढले; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज म्हणजे 13 सप्टेंबर 2021 ला तेजी नोंदली गेली आहे. मात्र सोन्याचा दर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली कायम राहीला. तर, चांदीच्या किमतीत (Silver) आज मोठी घसरण नोंदली गेली. यामुळे चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली गेली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,870 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 62,320 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचे दर वाढले, तर चांदीत विशेष बदल झाला नाही.

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 82 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी नोंदली गेली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 45,952 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

या आधारावर सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 10,248 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत वाढून 1,790 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या दरात आज मोठ्या घसरणीचा कल होता. यामुळे चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली गेली.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 413 रुपयांच्या मोठ्या घसरणीसह 61,907 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही आणि ती 23.66 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Web Titel :- Gold Price Today | gold price today gold gains and silver drastically dipped check update prices

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC Aadhaar Shila | महिलांसाठी ‘एलआयसी’नं आणली एक खास पॉलिसी; लाखोंचा होईल ‘लाभ’; जाणुन घ्या

ENG-PAK Cricket | भारतावर राग काढण्यासाठी आता PAK ला खुश करण्यासाठी निघाले इंग्लंड क्रिकेट बोर्ड, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 239 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी