Gold Price Today | महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक घट, सोनं 800 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घट होताना दिसत आहे. परंतु, मागील दोन दिवसात सोन्याच्या भावात साधारण वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर आज (मंगळवारी) दिल्लीत सोन्याच्या दरात (Gold Price Today) 810 रुपयांची घट झाली आहे. यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,896 रुपये इतका झाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने सोनं खरेदीसाठी ग्राहकांना खूशखबर आहे.

 

गतवर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याचे दर यावर्षी कमी म्हणजेच स्वस्त आहे. त्यामुळे यंदा सणामध्ये ग्राहकांनी सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किंमतीत रातोरात घट झाल्याचा परिणाम दिसून येत आहेत. याआधी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 47,706 रुपये इतका होता. तर चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज चांदीची किंमत (Silver Price) 62,720 रुपये इतकी आहे.

 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीचा (Gold Silver Price) दर क्रमश: 1806 डॉलर प्रति औंस आणि 24.05 डॉलर प्रति औंस घटला आहे. त्याचबरोबर फ्यूचर्स ड्रेटमध्ये सोन्याचा दर 106 रुपयांनी कमी होऊन 47,817 रुपये इतका झाला आहे. तर मल्टी कमॉडिटी एक्चेंजवर डिसेंबरच्या डिलिव्हिरीसाठीचा सोन्याचा दर 106 रुपयांनी घटल्याचं दिसत आहे.

 

मुख्य शहरातील सोन्या-चांदीचा भाव –

दिल्ली –

सोन्याचा दर – 46,896 रुपये

मुंबई –
सोन्याचा दर – 47,884 रुपये

चांदीचा दर – 64,532 रुपये

 

Web Title :- Gold Price Today | gold price today gold rate india 23 november 2021 live gold rate today 22 and 24 karat gold price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Railways चा मोठा निर्णय ! आता कुणीही भाड्याने घेऊन चालवू शकतं ‘ट्रेन’, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 48 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी