Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोने; चांदीही उतरली, कुणीही विचार केला नसेल इतक्या घसरणीचा, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today | राष्ट्रीय राजधानीच्या सराफ बाजारात शुक्रवारी सोने 301 रुपये घसरून 46,415 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 46,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदी सुद्धा 402 रुपयांच्या घसरणीसह 59,044 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात ती 60,446 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. (Gold Price Today)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरणीसह 1,789 डॉलर प्रति औंसवर राहिले. तर चांदी 22.08 डॉलर प्रति औंसवर जवळपास स्थिर राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल यांनी म्हटले की, न्यूयॉर्क येथील जिंस एक्सचेंज कॉमेक्समध्ये शुक्रवारी सोन्याचा हाजीर भाव घसरणीसह 1,789 डॉलर प्रति औंस राहिला. यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली. अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाव राहिला. (Gold Price Today)

2021 मध्ये सोन्यात ग्लोबल मार्केटमध्ये 3.6 टक्के घसरण दिसून आली आहे. जी 2015 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकता.

हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या

ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.

Web Title : Gold Price Today | gold-price-today-in-delhi-7-january-2022-latest-sonya chandi che dar janun ghya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Google Pay-Paytm-ATM | गुगल पे आणि पेटीएमचा वापर करून ATM मधून काढून शकता पैसे,

केवळ क्यूआर कोड (QR Coad) करावा लागेल स्कॅन

Intermittent Fasting | काय असतं इंटरमिटेंट फास्टिंग? जाणून घ्या वजन कमी करायची जबरदस्त पद्धत

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर

Omicron Covid Variant | हलक्यात घेऊ नका ‘ओमिक्रॉन’ला, वाढवू शकतो तुमच्या अडचणी;
जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Calcium For Bones | ‘या’ 10 कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थांचे करा सेवन, हाडे होतील मजबूत;
जाणून घ्या कमतरतेची लक्षणे