Gold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 13 ऑक्टोबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today) तेजीचा कल राहिला. तर, चांदीच्या दरात (Silver) सुद्धा आज वाढ नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,266 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 60,417 रुपये प्रति कि.ग्रॅ.वर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात उसळी आली, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 63 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी नोंदली गेली.
यातून राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,329 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किंमतीत तेजी नोंदली गेली आणि ते 1,768 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत आज वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 371 रुपयांच्या तेजीसह 60,788 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 22.80 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, कमजोर डॉलर आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये घसरणीमुळे सोने उच्च किंमतीवर व्यवहार करत आहे. कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या हाजीर भावात 0.46 टक्के तेजी नोंदली गेली आहे.
यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदली गेली. (Gold Price Today)

 

Web Title : Gold Price Today | gold price today jumped and silver price rose dollar rupee check update prices on 13 oct 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cryptocurrency | काय सांगता ! होय, जगात सर्वात जास्त 10.07 कोटी क्रिप्टोकरन्सी यूजर्स भारतात – रिपोर्ट

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार