Gold Price Today | सोन्याच्या दरात किरकोळ वाढ, चांदीही महागली; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : Gold Price Today | दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज (Gold Price Today) 22 नोव्हेंबर 2021 ला वाढ नोंदली गेली. चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा वाढ झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,852 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 64,246 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा आज सोने-चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही.

 

सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 17 रुपये प्रति 10 ग्रॅमची किरकोळ तेजी नोंदली गेली. यामुळे दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 47,869 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

 

तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि तो 1,846 डॉलर प्रति औंसवर पोहचला. याशिवाय फॉरेक्स मार्केटमध्ये आज सकाळी रुपया अमेरिकन चलन, डॉलरच्या तुलनेत 10 पैसे कमी होऊन 74.40 च्या स्तरावर व्यवहार करत होता. (Gold Price Today)

 

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)

चांदीच्या दरात आज उसळी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 444 रुपयांच्या तेजीसह 64,690 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीचा दर 24.85 डॉलर प्रति औंसवर स्थित होता.

 

सोन्यात का आली तेजी

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Security) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
आज कॉमेक्स (COMEX) वर सोन्याचा हाजीर भाव (Spot Gold Prices) मजबूतीने स्थिर राहिला.
यामुळे भारतीय बाजारात सुद्धा सोन्याच्या दरात किरकोळ तेजी नोंदली गेली.
सोबतच डॉलरमध्ये मजबूती आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये मजबूतीमुळे सोन्याच्या दरावर दबाव आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today jumps and silver increase check update gold rates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा