Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! एका महिन्यात 1200 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र आज (शुक्रवारी) सोन्याच्या किंमतीत किंचीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) नुसार सोन्याची किॆमत आज 0.04 टक्क्यांनी वाढली. तर, चांदीच्या दरात 0.12 टक्क्यांनी घट झाली आहे.

मागील चार ते पाच दिवस सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
आज मात्र, सोन्याच्या किंमतीत साधारण वाढ दिसून आली आहे.
महिनाभरात सोन्याचे दर 1,111 रुपयांनी कमी झाले आहेत. 26 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव 47,188 रुपये प्रति तोळा होता.
तर, चांदीची किॆमत 63,192 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती. आजचा सोन्याची भाव 46,075 रुपये प्रति तोळा आहे.
तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,714 रुपये प्रति किलो आहे.

सोन्याचे दर रेकॉर्ड हायपेक्षा 10,200 रुपयांनी कमी मिळत आहेत.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति तोळावर होते, सोन्याने यावेळी सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

 

दरम्यान, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल.
शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

 

Web Title : Gold Price Today | gold price today on 24 september down by 1200 rupees down in a month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari | …म्हणून त्यावेळी पुणेकरांनी माझ्यावर आणि फडणवीसांवर टीका केली (व्हिडीओ)

Ajit Pawar | ‘1 एकर जमिनीला 18 कोटी रुपये देणे व्यवहार्य नाही’ (व्हिडीओ)

Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस