Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील आठ दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. भारतीय सराफा बाजारात अनेक दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) घसरण होत असल्याने सोनं खरेदीदारांना योग्य वेळ साधून आली आहे. या आठ दिवसाच्या घसरणीनंतर आज (मंगळवार) देखील सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याच्या दरात 0.15 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (silver) घट 0.22 टक्क्यांनी घट झाली आहे.

आजच्या घसरणीनंतर सोन्याची किंमत (Gold price) 46,001 रुपये प्रति तोळा आहे.
तसेच चांदीची किंमत (silver price) 60,503 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. सध्या सोन्याचा दर कमी आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते.
आज एमसीएक्सवर सोन्याचा दर 46,001 रुपये प्रति तोळा आहे.
या दराच्या तुलनेत आज सोन्याचा दर 10,200 रुपयांनी कमी आहे.
या घटत्या किंमतीमुळे ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे.

22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर (Gold price) जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

हे देखील वाचा

Pune Metro | पुण्यातील मेट्रोचा बांधकाम क्षेत्राला फायदाच : डॉ. ब्रिजेश दीक्षित

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | gold price today on 28th sept 2021 gold rate down by 10200 rupee from record high check gold silver-rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update