Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काल (शुक्रवारी) सोन्याच्या दरात साधारण वाढ झाली होती. ऐन सनामध्ये सोन्याचा दर कमी होता. आणि सध्या लग्नसराईच्या सीजनमध्ये देखील सोन्याचा दर कमीच आहे. या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जात आहे. कारण सध्या सोनं स्वस्त मिळत आहे. आज (शनिवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,530 रुपये आहे.

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोन्याच्या किंमती कमी होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात साधारण वाढ झाली होती तर, आज त्या दरात घसरण झाल्याच दिसत आहे. दरम्यान, सध्या लग्नसराईचा सीजन सुरू आहे. या पार्श्वभुमीवर अनेकजण सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करीत आहेत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे ग्राहकाला सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी आहे. (Gold Price Today)

सोन्याचा भाव काय? – (IBJA च्या वेबसाइटनुसार)

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,530 रुपये

23 कॅरेट सोन्याचा भाव – 47,340 रुपये

22 कॅरेट सोन्याचा भाव – 43, 537 रुपये

18 कॅरेट सोन्याचा भाव – 35,648 रुपये

14 कॅरेट सोन्याचा भाव – 27,805 रुपये

दरम्यान, बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold Price Today) शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. तसेच, सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today on 4 december 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Railway Station | पुणे स्टेशनचा भार होणार हलका ! ‘मरे’ वाढवणार हडपसर टर्मिनलमधून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची संख्या

Hanuma Vihari | टीम इंडियाने दुर्लक्षित केलेल्या हनुमा विहारीची आफ्रिकेत ‘कमाल’

Online Games आता झाले ‘जुगार’ आणि ‘सट्टा’, लागू व्हावा समान कर ! 43 कोटींपेक्षा जास्त यूजर्स खेळतात ऑनलाइन गेम