Gold Price Today | 2 दिवसानंतर सोने पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात लागोपाठ दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली होती. मात्र, आज 28 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) वाढ झाली आहे. यानंतर 10 ग्रॅम सोन्याचा दर 47000 रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरात (Silver) आज घसरण झाली. 1 किलोचा चांदीचा दर 64000 रुपयांच्या खाली आहे.

 

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर चांदी 63,970 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

 

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 112 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली.
दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने 47 हजार रुपयांवर म्हणजे 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
सणासुदीच्या काळात सोने सर्वोच्च स्तरापासून 9150 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा सर्वोच्च स्तर गाठला होता.

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

 

चांदीच्या दरात आज घसरण नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 203 रुपयांची घसरण झाली. आज चांदीचा दर 63,767 रुपये प्रति किलो आहे.

 

सोन्याच्या दरात का झाली वाढ?

 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Security) सीनियर अनालिस्ट तपन पटेल यांच्यानुसार, कॉमेक्सवर गोल्ड दरात वाढीची नोंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात मिळालेल्या संकेतांमुळे सोन्याचा दर वाढला आहे.
तसेच अमेरिकन बाँड यील्डमध्ये घसरण झाल्याने सोन्याचा दर वाढला. (Gold Price Today)

 

Web Title : Gold Price Today | Gold Price Today silver price fall check todays latest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray | ‘लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ’

Madhav Bhandari | ‘परीक्षेच्या गोंधळाबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपेंची न्यायालयीन चौकशी करा’

Sindhudurg | धक्कादायक ! बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला; वडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगा जखमी