Gold Price Today | चांदीत 1300 रुपयांपेक्षा मोठी ‘घसरण’, सोने 45 हजार रुपयांच्या ‘खाली’; जाणून घ्या आजचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 30 सप्टेंबर 2021 ला चांदीत ताबडतोब घसरण (Silver Price Today) नोंदली गेली आहे. यामुळे चांदी 58 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली गेली आहे. तर, सोन्याच्या दरात (Gold Price Today) सुद्धा आज घट झाली आहे. यामुळे सोने 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली गेले. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 58,692 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराच्या (Gold Price Today) उलट आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात तेजी आली, तर चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही.

सोन्याचे आजचे नवीन दर (Gold Price Today)
दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या दरात 154 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर आज 44,976 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली आणि ती 1,733 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)
चांदीच्या किमतीत सुद्धा आज जबरदस्त घसरणीचा कल दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर 1,337 रुपयांच्या मोठ्या घसरणीसह 58 हजार रुपयांच्या खाली जाऊन 57,355 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि तो 21.64 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

सोन्यात का झाली घसरण (Gold Price Today)
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की,
अमेरिकन फेड रिझर्व्हकडून प्रोत्साहन पॅकेजमध्ये कपातीची शक्यता दिसत आहे.
अशावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1730 डॉलर प्रति औंसच्या जवळपास व्यवहार करत आहे.
याचा परिणाम भारतीय सराफा बाजारांवर सुद्धा दिसत आहे.
सोन्यात लागोपाठ जारी उलथा-पालथीमुळे चांदीच्या किमतीवर सुद्धा दबाव आहे.

Web Title :- Gold Price Today | gold price today silver prices fell drastically by more than rupees 1300 and god declines below rupees 45000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पुण्यातील रस्ते खोदाईनंतरच्या दुरूस्तीच्या कामांसाठी पुन्हा कोट्यवधीच्या निविदा; महापालिकेचा ‘आंधळ दळतयं कुत्रं पीठ खातयं’चा कारभार

Pune Police Crime Branch | कोकेन बाळगणाऱ्या 2 नायजेरियन नागरिकांना अटक, 2 लाखाचे कोकेन जप्त

NCP Prashant Jagtap | सिरिंजच्या तुटवड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सत्ताधाऱ्यांवर ‘हल्लाबोल’