Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरूच, 10 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त दराने मिळतंय, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरणीचे सत्र जारी आहे. आज म्हणजे 8 सप्टेंबर 2021 ला सुद्धा दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट नोंदली गेली. याउलट चांदीच्या किमतीत (Silver) आज तेजी नोंदली गेली आहे.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,404 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
तर, चांदी 63,464 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
भारतीय सराफा बाजाराच्या उलट अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर वाढले.
तर चांदीत विशेष बदल झाला नाही.

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात 264 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली.
राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

सोने मिळत आहे 10 हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त

सोने आपल्या सर्वोच्च स्तराच्या तुलनेत 10,060 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त मिळत आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता.
या आधारावर सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे.
अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत वाढून 1,798 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत आज सोन्याच्या उलट तेजीचा कल होता.
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 22 रुपयांच्या किरकोळ तेजीसह 63,486 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही आणि ती 24.37 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

 

Web Title : Gold Price Today | gold price today slipped by rupees 264 to 46140 still rupees 10060 lower then peak rates gold rates update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Court | गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणातून खून करणाऱ्याला जन्मठेप

Sharad Pawar | मनपा निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य – शरद पवार

Modi Cabinet Decision | कॅबिनेटच्या निर्णयाने महाराष्ट्रासह ‘या’ 8 राज्यांना सर्वात जास्त फायदा, भारतीय कंपन्या बनतील जागतिक चॅम्पियन!