Gold Price Today | खुशखबर ! एक महिन्याच्या निच्चांकी स्तरावर सोन्याची किंमत, चांदीसुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : कमजोर जागतिक संकेतांचा परीणाम सोने आणि चांदीच्या (Gold Price Today) किमतींवर सुद्धा दिसून येत आहेत. MCX वर सोन्याचा दर (Gold price today) आज 0.14 टक्के वाढीसह 46,872 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर व्यवहार करत आहे, परंतु यावेळी सुद्धा तो एक महिन्या खालच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

तर चांदीच्या किमतीत (silver price today) आज घसरण आहे. चांदी 0.4 टक्केच्या घसरणीसह 63,345 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर आहे. तर, मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याच्या किमतीत 0.4 टक्केची घसरण दिसून आली होती आणि चांदीच्या किमतीत 0.9 टक्के घसरण झाली होती.

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मागील आठवड्यात मोठी घसरण दिसून आली होती.
मागील आठवड्यात 2.1 टक्केच्या घसरणीनंतर हाजार सोने 1,787.40 डॉलर प्रति औंस वर होते.
याशिवाय मागील आठवड्यात 0.6 वाढीनंतर डॉलर इंडेक्स वाढून 92.632 वर पोहचला.

24 कॅरेट सोन्याचा नवीन दर

सोन्याच्या किमती सर्व शहरांमध्ये वेगवेगळ्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 50340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
याशिवाय चेन्नईत 48390 रुपये, मुंबईत 47070 रुपये आणि कोलकातामध्ये 49140 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.

हे देखील वाचा

Wipro Ends Work From Home | ‘विप्रो’ने 18 महिन्यानंतर बंद केले कर्मचार्‍यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, 55 % कर्मचार्‍यांचं झालंय लसीकरण; आजपासून उघडली कार्यालये

Pune Crime | पुण्याच्या कात्रज घाटात प्रेम संबंधातून 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Gold Price Today | gold price today struggles near 1 month low on mcx and silver price also down

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update