नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) आज तेजीसह व्यवहार होत आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोने 0.19 टक्केच्या वाढीसह व्यवहार करत आहे. MCX वर सोने (Gold price today) 90 रुपयांच्या तेजीसह 47624 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे. याशिवाय चांदी 0.29 टक्के म्हणजे 195 रुपयांच्या तेजीसह 67219 रुपयांच्या लेव्हलवर व्यवहार करत आहे. तर, सोने विक्रमी स्तरापासून सुमारे 8576 रुपये स्वस्त मिळत आहे.
याशिवाय इंटरनॅशनल मार्केटबाबत बोलायचे तर येथेही तेजीसह व्यवहार होत आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 7.01 डॉलरच्या तेजीसह 1,807.23 डॉलर प्रति औंसच्या लेव्हलवर आहे. तर, चांदी 0.10 डॉलरच्या तेजीसह 25.28 डॉलरच्या लेव्हलवर आहे.
विक्रमी लेव्हलपासून किती स्वस्त?
जर तुम्ही मागील वर्षी ऑगस्टच्या तुलनेत पाहिले तर MCX वर 2020 मध्ये यावेळी 10 ग्रॅम
सोन्याचा भाव सुमारे 56,200 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता. तर एमसीएक्स (MCX)
नुसार, आज सोने 47624 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. म्हणजे आजही सोने 8576 रुपये
स्वस्त मिळत आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.
Barshi News | बार्शी ही गुणवत्तेची खाण ! चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांचे गौरवोद्गार
Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या