सोनं महागलं, चांदी मात्र स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत गुरुवारी 3 रुपयांनी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव फक्त 3 रुपयांनी वाढले तर चांदी 24 रुपयांनी स्वस्त झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने 1,510 डॉलर प्रति औंस राहिले.

10 ग्रॅम सोन्याचे दर
दिल्ली सराफा बाजारात सोने गुरुवारी 3 रुपयांनी महाग होऊन 39,375 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. बुधवारी सोने 39,372 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

चांदीच्या नव्या किंमती
चांदी 24 रुपयांनी घसरली आणि 47,120 रुपये प्रति किलोग्रॅम झाले. बुधवारी चांदी 47,144 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अ‍ॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिका चीनमध्ये अजूनही व्यापार युद्ध सुरु आहे. त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळात सोन्याच्या किंमतीत तेजी येऊ शकते. अमेरिका चीन व्यापार युद्धाने अनिश्चितता, ब्रेक्जिट कंसर्न आणि कमजोर अर्थव्यवस्थेमुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम दिसून येत आहेत.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या सोन्याच्या किंमती
तुम्ही जे सोने खरेदी करतात त्यांची किंमत स्पॉट प्राइस म्हणजेच हाजीर भाव असतो. अनेक शहरात सराफ असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार सुरु होण्याआधी किंमत निश्चित करतात. MCX वायदा बाजारात देखील सोन्याचे भाव येतात, लेव्ही किंवा सोने घडण याचे दर लावून सोन्याचे दर निश्चित केले जातात. तेच दर दिवसभर चालतात. त्यामुळे अनेकदा विविध शहरात सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. याशिवाय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत शुद्धतेच्या आधारे निश्चित केली जाते. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

visit : policenama.com 

You might also like