Gold Price Today : प्रचंड घसरणीनंतर शुक्रवारी पुन्हा वाढल्या ‘सोन्या-चांदी’च्या किंमती, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती घसरल्यानंतरही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या कमकुवततेचा परिणाम स्थानिक पातळीवर दिसून आला आहे. शुक्रवारी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 730 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, या दरम्यान एक किलोग्रॅम चांदीच्या किमतीत (Silver Price in Delhi) 1,520 रुपयांची जोरदार तेजी दिसून आली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत तब्बल 7 वर्षांच्या घसरणीनंतरही हलक्या रिकव्हरीची अपेक्षा केली जात आहे. तथापि, पुढील आठवड्यात सोन्याच्या किंमतींवर दबाव पुन्हा वाढू शकतो.

सोन्याचे नवीन दर

रविवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 52,961 रुपये प्रति 10 ग्रॅम वरून 53,691 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. या काळात दर 10 ग्रॅमच्या किमती 730 रुपयांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 52,956 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहेत.

चांदीचे नवीन दर

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीची किंमत 68,980 रुपयांवरून 70,500 रुपयांवर पोहोचली आहे. या काळात किंमतींमध्ये 1,520 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 68,676 रुपयांवर पोहोचला आहे.

आता पुढे काय घडेल

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या आठवड्याच्या सुरूवातीला सोन्याचे वायदे भाव प्रति दहा ग्रॅम 56,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. नंतर ते बुधवारी घसरून 50,000 रुपयांवर आले. त्यात 10 टक्क्यांनी घट झाली. त्याचप्रमाणे आठवड्याच्या सुरूवातीला चांदीचे वायदे भाव 78,000 रुपयांवर पोहोचले. त्यानंतर सुमारे 22 टक्क्यांनी घसरून 61,000 रुपयांवर आले.