Gold Price Today | स्वस्त झाले सोने, चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोने आणि चांदीची (Gold price today) खरेदी करण्यासाठी चांगली बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण (Gold price today) झाली आहे. कमजोर ग्लोबल संकेतादरम्यान इंडियन मार्केटमध्ये सुद्धा सोने आणि चांदीत कमजोरी दिसून येत आहे. MCX (Multi commodity exchange) वर सोने 48,076 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर व्यवहार करत आहे. तर, चांदी 0.4 टक्के म्हणजे 274 रुपयांच्या घसरणीसह 68045 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर, मागील सत्रात सोने 400 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले होते.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा सोन्याच्या किमती सपाट स्तरावर आहेत.
शुक्रवारी जवळपास 1 टक्केच्या घसरणीनंतर हाजिर सोने 0.1 टक्के वाढून 1,812.83 डॉलर प्रति औंस झाले होते.
चांदी 0.6 टक्के घसरून 25.50 डॉलर प्रति औंस झाली, तर प्लॅटिनम 0.2 टक्केच्या घसरणीसह 1,100.55 डॉलरवर आले.

रेकॉर्ड लेव्हलपासून किती स्वस्त?

मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत पाहिले तर एमसीएक्सवर 2020 मध्ये यावेळी 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 56,200 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता.
तर एमसीएक्सनुसार, आज सोने 48,076 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.
म्हणजे अजूनही सोने 8124 रुपये स्वस्त मिळत आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल करा.
यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये लेटेस्ट भाव चेक करू शकता.

Web Title : Gold Price Today | gold prices remain weak and silver price also down on 19 july 2021 check 10 gram gold price here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Oil Massage | केसांना तेलाची मालिश करण्याचा योग्य मार्ग अन् वेळ काय असावी; जाणून घ्या

Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा’; अनेकांच्या भुवया उंचावल्या (व्हिडीओ)

Anil Deshmukh | दिल्ली दौऱ्यानंतर माजी गृहमंत्री Underground?; अनिल देशमुख कुठे आहेत त्यांचा ठावठिकाणा नाही?