सोनं-चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा तेजी आली. शुक्रवारी दिल्लीत सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत 10 ग्रॅममध्ये 126 रुपयांनी वाढ झाली. तसेच उद्योगातून वाढणाऱ्या मागणीमुळे चांदीचे दर 380 रुपये प्रति किलोग्रॅम वाढले. तज्ज्ञांच्या मते सणासुदीच्या निमित्ताने सराफ बाजारातून वाढलेली मागणी आणि रुपयात आलेल्या कमजोरीमुळे सोने खरेदी करणे महागले आहे.

सोन्याच्या नव्या किंमती –
HDFC सिक्युरिटीनुसार दिल्ली सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 126 रुपयांनी वाढ झाली यामुळे सोने 39,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. गुरुवारी 10 ग्रॅम सोने 39,034 रुपये होते.

चांदीचे दर –
दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीचे दर 46,520 रुपयांवरुन 46,900 रुपये वाढले.

का महाग झाले सोने –
HDFC सिक्युरिटीज चे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांत घसरण झाल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सणानिमित्त सराफ बाजारातून सोन्याची छोटी मोठी मागणी देखील करण्यात येत आहे.

धनतेरसला फक्त 1 रुपयांत खरेदी करु शकतात सोने –
– पेटीएम गोल्डवरुन सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला पेटीएमच्या गोल्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल, येथून तुम्ही सोने खरेदी करु शकतात.

– खरेदी बरोबरच तुम्ही सोने देखील विकू शकतात. कंपनीचा दावा आहे की प्लॅटफॉर्मवर विकण्यात येणारे सोने 24 कॅरेट 99.9 शुद्ध आहे.

– येथे तुम्ही खरेदी केलेले सोने एका सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्यात येते, तुम्ही जेव्हा हवे तेव्हा सोन्याची होम डिलीवरी घेऊ शकतात.

– पेटीएम गोल्ड शिवाय तुम्ही बुलियन इंडियाच्या माध्यमातून सोने खरेदी करु शकतात, येथे तुम्हाला कमीत कमी 300 रुपयांचे सोने खरेदी करावे लागू शकते.

– याचा विमा देखील करण्यात येईल. येथे देखील तुम्ही वॉलेटमध्ये सोने जमा करु शकता आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा होम डिलीवरी मागवू शकतात.

– पेटीएम गोल्डची शुद्धतेची 100 टक्के गारंटी आहे आणि 1 ग्रॅम सोने होताच तुम्ही गोल्ड डिलीवरी तुमच्या आदेशानुसार मागवू शकतात.

– डिलीवरी 1,2,5,10,20 ग्रॅम चे शिक्के मिळते, याबरोबरच पेटीएमकडून आपल्या प्लॅटफॉर्मवरुन डिजीटल ट्रांजेक्शन करणाऱ्यांना कॅशबॅकच्या रुपात डिजीटल गोल्ड घेण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येतो.

visit : Policenama.com