Gold Price Today | खुशखबर ! 5 महिन्यामधील सर्वात स्वस्त मिळतंय सोने, विक्रमी किमतीपासून 10 हजार रुपयांनी कमी झाला दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरणीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सुद्धा सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण नोंदली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने 17 सप्टेंबरला 09.15 वाजता 0.03 टक्के घसरणीसह 46,060 रुपयांवर स्थिर व्यवहार करत आहे. सोन्याची किंमत मागील पाच महिन्याच्या सर्वात खालच्या स्तरावर पोहचली आहे.

शुक्रवारी चांदीच्या किमतीत चांगली तेजी दिसून आली. चांदी 0.25 टक्के वाढून 61,231 रुपये झाली.
मागील सत्रात, सोने 1.7% किंवा रूपये 807 प्रति 10 ग्रॅम घसरले होते.
जे तीन दिवसात घसरून 1200 रूपये झाले होते.
चांदी मागील सत्रात 2150 रूपये किंवा 3.5% प्रति किलोग्रॅमने घसरली होती.

10,000 रुपये स्वस्त मिळत आहे सोने

मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता.
आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 46,060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सुमारे 10,000 रुपयांनी सोने स्वस्त मिळत आहे.

22 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

आज नवी दिल्ली आणि मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने अनुक्रमे 46,150 रुपये आणि 45,780 रुपयांनी विकले जात आहे. चेन्नईत सोने 44,300 रुपयांनी विकले जात आहे.
तर दिल्लीत 24-कॅरेट सोने 50,350 रुपये आणि मुंबईत 46,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईत आज सकाळी सोने 48,330 रुपयांनी विकले जात आहे.

तर कोलकातामध्ये 24-कॅरेट सोने 49,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या भावाने विकले जात आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold prices today drop to lowest in 5 months after big fall over rs10k down from record level

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | कुणीही घेऊ शकत नाही 2 प्रौढ व्यक्तींच्या संबंधाला आक्षेप, मग ते आई-वडील असले तरीही – हायकोर्ट

Pune Crime | भावकीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना

MLA Ashutosh Kale | शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी NCP चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती