Gold Price Today | खूशखबर ! सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृतसंस्था – Gold Price Today | गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today ) घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसांपासून सलग सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे चार दिवस झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यास एक सुवर्णसंधीच आहे. आजच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव (22 कॅरेट) 45120 रुपयांपर्यत पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा देखील होत आहे. तसेच, चांदीची किंमत (silver) सध्या 59600 रुपये प्रति किलो आहे.

सामान्य सोन्याची किंमत (Gold Price) आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या भावामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. दरम्यान, बाजार भावात सोन्याच्या किंमती उतरल्याने सोनं सध्या 45 हजारापर्यंत स्वस्त मिळत आहे.

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.36 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5  प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

 

काय आहे सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 44520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47660 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45120 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46120 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45120 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47120 रुपये

Web Titel :- Gold Price Today | gold rate price today on 21 september 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कोंढव्यात पतीनेच पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; जाणून घ्या प्रकरण

Pune Police | पुण्यातील ‘या’ पोलीस स्टेशनमधील कर्मचारी निलंबित; यापूर्वी त्याच प्रकरणात झाली होती अधिकाऱ्यावर कारवाई

Parbhani Gang Rape | परभणीतील सोनपेठ तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार ; पीडितेने उचलले ‘हे’ पाऊल