Gold Price Today | सोन्याच्या दरात सलग घसरण, चांदीही ‘स्वस्त’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील काही दिवसापासून सातत्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) वारंवार बदल होत असतो. मात्र, मागील आठ दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण बदल होताना दिसत आहे. सोन्याच्या सलग घसरणीमुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी एक मोठी संधी आहे. आज (सोमवारी) सोन्याच्या किंमतीत घसरण होऊन 22 कॅरेट सोनं 45,240 रुपये पर्यंत पोहचले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (Silver Price) घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा चांदीचा दर 59,900 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घसरण होत आहे. गेल्या सात ते आठ दिवसापांसून सोन्याच्या किंमती उतरताना दिसत आहेत. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही योग्य वेळ असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सामान्य सोन्याचा भाव आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. (Gold Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

आजचे सोन्याचे दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 44,440 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 47,580 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,240 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,240 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 45,240 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,240 रुपये

चांदीचा दर (Silver Price) – 59,900 रुपये

हे देखील वाचा

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 27060 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

High Return Stocks | ‘हे’ शेयर्स करताहेत पैशाचा वर्षाव! करा इथं ‘इन्व्हेस्ट’, एका झटक्यात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | gold rate price today on 27 september 2021 forecast outlook silver price rate today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update