Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. दिवाळी सना आगोदर सोन्याच्या किंमती (Gold Price Today) पुन्हा घसरताना दिसत आहेत. आज (गुरूवार) सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात मात्र वाढ दिसून आली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,120 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत 68,900 रुपये इतकी आहे. सोन्याच्या घसरणीने ग्राहकांना खरेदीसाठी संधी निर्माण झाली आहे.

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झालेलं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव कमी झाला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव सर्वोच्च पातळीवर पोहोचला होती. सोन्याच्या सततच्या घसरणीने ग्राहाकांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर (Gold Price Today) आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचबरोबर ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.

 

काय आहे आजचा सोन्याचा दर?

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 46,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,580 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,120, रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,120 रुपये

आजचा सोन्याच्या भाव – 68,900 रुपये.

 

Web Title :- Gold Price Today | gold rate price today on 28 october 2021 forecast outlook silver price rate today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ! महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांचे प्रतिपादन

Pune Smart City | स्मार्ट सिटी योजना ! नावलौकीक मोदींचे पैसा पुणेकरांचा – माजी आमदार मोहन जोशी

Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB चा साक्षीदार किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; गुन्हे शाखेनं पकडलं