Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे. मागील पाच दिवसापांसून सलग सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आजही (गुरुवारी) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदीची एक सुवर्णसंधीच आहे. देशांतर्गत बाजाराबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) ऑक्टोबर फ्युचर्समध्ये सोन्याचे भाव 0.75 टक्क्यांनी प्रति 10 ग्रॅम कमी झाले आहे. तर, डिसेंबर वायदा चांदीचे भाव 1 टक्क्यांहून अधिक घसरले.

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

आज (गुरुवारी) ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याची किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) 349 किंवा 0.75 टक्क्यांनी घसरून (Gold Price Today) 46,323 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 0.3 टक्क्यांनी घसरून 22.60 डॉलर प्रति औंस झाले. डिसेंबर वायदा चांदी (Silver Price) 632 रुपये किंवा 1.03 टक्क्यांनी घसरून 60,548 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

दरम्यान, रुपया कमकुवत झाल्यामुळे बुधवारी सोने आणि चांदीचे भाव वाढले आहेत.
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 196 रुपयांनी वाढून 45,746 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोन्याप्रमाणे चांदीही वाढली.
एक किलो चांदीची किंमत 319 रुपयांनी वाढून 59,608 रुपये प्रति किलो झाला आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव –

तुम्हाला जर सोन्याचांदीचे (Gold Silver Price Today) दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

हे देखील वाचा

Pune Crime | प्रेमविवाहानंतर आणखी 2 ते 3 महिलांशी अनैतिक संबंध! पुण्यात पोलीस कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल, पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

Municipal Elections | ‘महाविकास’मध्ये प्रभाग सदस्यीय संख्येवरून अद्याप एकमत नाही?, 3 सदस्यीय प्रभागाच्या बातम्यांमुळे राजकिय वातावरण ‘नरम-गरम’; नगरसेवक व इच्छुकांची धाकधूक मात्र वाढली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Gold Price Today | gold rate today big drop in gold price know the new price of 10 grams of gold on 23 sept 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update