Gold Price Today | खूशखबर ! सोन्याचे दर पुन्हा उतरले; 8059 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती घटत आहेत. त्यामुळे आजही (मंगळवारी) सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) मोठी घट झाली आहे. काही दिवसांवर दिवाळी सन सुरू होतोय, पंरतु या कालावधीत सोन्याचा दर कमीच राहील अशी अपेक्षा ग्राहकांकडून होताना दिसत आहे. रेकॉर्ड हायपेक्षा 8059 रुपयांनी सोन्याचा भाव कमी आहे.

 

मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.12 टक्क्यांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात (Silver price) 0.29 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गतवर्षी ऑगस्टमध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. तर, आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत सोने 48,141 रुपये प्रति तोळावर आहे. याचा अर्थ आज सोने सुमारे 8059 रुपयांनी स्वस्त (Gold Price Today) मिळतयं.

आजचा सोन्याचा दर – (Gold Price) – 48,141 रुपये

आजचा चांदीचा दर – (Silver Price) – 65,964 रुपये

 

दरम्यान, जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्याचबरोबर ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

 

Web Title :- Gold Price Today | gold rate today falls down and gold price are down by rs 8059 from record high

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल

Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना थेट धमकी?; म्हणाले – ‘बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का?’

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना? प्रशासन, स्थायी समितीमध्ये अद्याप बोनसचा ‘प्रस्ताव’ नाही

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ