रेकॉर्डब्रेक ! सोन्याच्या दराची ‘उच्चांकी’, किंमती आणखी वाढण्याची दाट शक्यता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना सोन्याच्या किमतीचा ग्राफ चढताच आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती 50 हजारांच्या जवळ पोहचल्या आहेत. 2019 या वर्षात 25 टक्के रिटर्न दिल्यानंतर यावर्षी देखील सोन्यामधून त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळण्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सोन्याच्या वाढणाऱ्या किंमतींना आजही ब्रेक मिळताना दिसत नाही. कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत असून सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.


सोन्यानंतर चांदीचे दर देखील गेल्या 7 वर्षात उच्चस्तरावर आहेत. मौल्यवान धातूंच्या किमंतीमध्ये आलेल्या या तेजीनंतर ETF मध्ये देखील गुंतवणूक वाढली आहे. त्यातच डॉलरमध्ये घसरण झाल्याने सोन्याला याचा सपोर्ट मिळत आहे.

इंडियन बूलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबवसाइटनुसार गुरुवारी (दि.9) बाजार उघडताच सोन्याच्या किंमती वाढल्याचे पहायला मिळाले. बुधवारी बाजार मंद होत असताना सराफा बाजारात 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 49 हजार 122 रुपये इतकी होती. आज सोन्याच्या दरामध्ये 396 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याचे आजचे भाव
24 कॅरेट सोन्याचे आजचा भाव 49 हजार 318 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहेत. तसेच इतर शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती देखील वाढल्या आहेत. 23 कॅरेट सोन्याचे भाव सकाळी 196 रुपये प्रति तोळाने वाढून 49120 रुपयावर पोहचले आहेत. बुधवारी बाजार बंद होताना हे दर 48925 रुपये प्रति तोळा होते. त्याचप्रमाणे 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव देखील वाढले आहेत. या शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे 45175 आणि 36989 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

चांदीही महागली
चांदीने गेल्या 7 वर्षामध्ये 2020 मध्ये सर्वात उच्च स्तरावर आहे. बुधवारी चांदीचे भाव 50140 रुपये प्रति किलो होते. यामध्ये प्रति किलो 1092 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे आजचे सकाळच्या सत्रातील दर 50 हजारांवर गेले आहेत. आजचे चांदीचे भाव 51253 रुपये प्रति किलो झाले आहेत. बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये बदल झालेला पहायला मिळातो.