Gold Price Today | सोन्याच्या दरात ‘घसरण’ तर चांदीच्या दरात ‘तेजी’, जाणुन घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम Gold Price Today | बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या भावात सलग घसरण दिसुन आली. त्यानंतर सोन्याचे भाव किरकोळ प्रमाणात वधारले. मात्र, आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जवळपास सोन्याच्या दरात 80 रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे. किंमतीत घट होऊन देखील सोन्याचा भाव 47000 रुपये प्रति तोळापेक्षा अधिक आहे. आजच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव 47,200 रुपयेपर्यत पोहचला आहे.

आज (शनिवार) सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण पाहायला मिळाली. मात्र चांदीच्या किंमती वाढल्या असल्याचं समोर आलं आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटन दिलेल्या माहितीनुसार चांदीच्या किंमती (Silver Price) वाढल्या आहेत. चांदीच्या किंमतीत (Silver Price) आज 100 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचा भाव प्रति किलो 63,600 रुपये पर्यत स्थिर आहे.

घरबसल्या जाणून घ्या सोन्याचे दर –

तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर (Gold silver price) माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

 

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

 

Web Title : Gold Price Today | gold rates today and silver rates today on 4th sept check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Health Care Tips | तुम्ही सुद्धा आहात घामोळ्यांनी त्रस्त? तर अवलंबा ‘हे’ 2 घरगुती उपाय; जाणून घ्या

khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’

Thane Police Transfer | ठाणे पोलिस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या