Gold Price Today | सोन्याच्या किमतीत आज पुन्हा उलथापालथ ! 27873 रुपयात मिळतंय एक तोळा, जाणून घ्या आपल्या शहरातील 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Gold Price Today | सोने खरेदी करणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या व्यवहाराच्या आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी (24 August) सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण नोंदली जात आहे. सध्या सोने आणि चांदी दोन्ही घसरणीसह ट्रेड (Gold Price Today) करत आहेत.

MCX वर सोने-चांदीचे नवीन दर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आज सोन्याच्या किमतीत 0.18 टक्के म्हणजे 84 रुपयांची घसरण नोंदली जात आहे.
या घसरणीसह सोने सध्या 47,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेंड करत आहे.
यापूर्वी सोने 47584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आज सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा मंदी दिसून येत आहे. सध्या चांदी 0.13 टक्के म्हणजे 81 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने घसरणीसह 62,846 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत आहे.
यापूर्वी सोमवारी चांदी 63608 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.

IBJA वर सोने-चांदीची ताजी स्थिती

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार आज सोन्याच्या किमतीत 235 रुपये प्रति तोळाच्या दराने वाढ दिसून येत आहे.
सध्या सोने 47646 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे तर सोमवारी सोने 47411 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते.

येथे सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा तेजी दिसून येत आहे.
सोमवारच्या तुलनेत आज चांदी 325 रुपयांनी महागली.
सध्या चांदी 235 रुपयांच्या वाढीसह 63030 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर आहे.

 

14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर

मंगळवारी आज भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47646 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेटचे सोने 47455 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचे सोने 43664 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेटचे सोने 35735 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटचे सोने 27873 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.

ऑलटाइम हायपासून सोने 9000 आणि चांदी 17000 रुपये स्वस्त

अशाप्रकारे सोने आणि चांदी अजूनही ऑलटाइम हायपासून खुप स्वस्त आहे.
सोने आपल्या ऑलटाइम हायपासून सुमारे 9000 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोने आपल्या ऑलटाइम हाय वर ऑगस्ट 2020 मध्ये होते.
त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर गेले होते.

तर चांदीचा आतापर्यंतचा उच्चतम स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.
या हिशेबाने चांदीसुद्धा आपल्या उच्चतम स्तरापासून सुमारे 17000 रुपये स्वस्त विकली जात आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold silver jewelry price rate latest update 24th august know latest rate indian sarafa market today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Narayan Rane Arrested | नारायण राणे जेवण देखील पुर्ण करू शकले नाहीत, रत्नागिरी पोलिसांनी मधूनच घेतलं ताब्यात; पाहा व्हिडीओ

Pune Court | शपथपत्रात लपविले उत्पन्नाचे स्रोत, न्यायालयाने अंतरिम पोटगी व इतर खर्चाची मागणी नाकारली

Pune Crime | देव तरी त्याला कोण मारी ! पुण्यात आईनेच पोटच्या बाळाला फेकले ओढ्यात, मात्र बाळ ‘सुखरुप’