Gold Price Today | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदारांच्या चेहर्‍यांवर समाधान, जाणून घ्या आठवडाभरातील सोने-चांदीची स्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | जर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. या व्यवहाराच्या आठवड्यात एकीकडे सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदली गेली तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत तेजी दिसून आली. सोन्याची किंमत 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. तर, चांदीचा दर 61 हजार रुपयांवरून वाढून 62 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ पोहचला आहे. (Gold Price Today)

 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ची वेबसाइट ibjarates.com नुसार, संपूर्ण व्यवहाराच्या आठवड्यात 24 कॅरेट सोने 263 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले. तर 999 शुद्धतेच्या चांदीच्या किंमतीत 777 रुपये प्रति किलोची वाढ नोंदली गेली.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार या व्यवहाराच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबरला (सोमवार) 24 कॅरेटचे सोने 48527 रुपये प्रति 10 ग्रॅम होते जे 24 डिसेंबरपर्यंत (शुक्रवार) 263 रुपये घसरणीसह 48264 रुपयापर्यंत आले आहे. तर सोमवारी चांदी 61106 रुपये प्रति किलोच्या स्तरावर होती. जी शुक्रवारी 777 रुपये प्रति किलोच्या दराने वाढून 61883 रुपयांच्या स्तरावर गेली. (Gold Price Today)

 

कॅरेट –   20 डिसेंबरचा दर  –  24 डिसेंबरचा दर  –   किती झाले स्वस्त

24           48527 /-                      48264/-                      263/-

  23           48333 /-                     48071 /-                          262/-

         22           44451/-                          44210/-                      241/-

 18            36395 /-                       36198/-                         197/-

14            28388 /-                    28234/-                          154/-

 

इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचा दर जारी करत नाही. जाणकारांनुसार, येत्या एक-दोन दिवसात सोने आणि चांदीत तेजी दिसू शकते.

 

Web Title :- Gold Price Today | gold silver jewelry rate price latest update 26th december 2021 know latest rate indian sarafa market today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aadhaar Card | घरबसल्या ऑनलाइन व्हेरिफाय होईल तुमचे आधार कार्ड, जाणून घ्या काय आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला जाणाऱ्या बीडच्या शिवसैनिकाचा वाटेत मृत्यू

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक