Gold Price Today | दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची घसरण, 47,161 रूपयात मिळतंय 10 ग्रॅम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय बाजारात सोन्या – चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) आणि सराफा बाजार या दोन्हीमध्ये वेग पकडला आहे. एमसीएक्सवर सोन्याचे (MCX Gold Price) जून फ्युचर्स मार्केट 0.08 टक्क्यांनी वाढून 50,998 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. एमसीएक्सवर चांदीची किंमत (MCX Silver Price) 0.59 टक्क्यांनी वाढून 61860 रुपये प्रति किलो झाली आहे. (Gold Price Today)

 

व्याजदर वाढल्याने घसरले होते सोने
यापूर्वी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. वास्तविक, गेल्या काही दिवसांत फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंड आणि आरबीआयने व्याजदरात वाढ केली होती. मार्चच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 56000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ आला होता. त्यानुसार सोन्याचा भाव सध्या 5000 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरणीवर सुरू आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 47161 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

47161 रुपये प्रति 10 ग्रॅम दर
आयबीजेएच्या मंगळवारच्या दरानुसार, 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 51486 रुपये, 23 कॅरेट 51280 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने 47161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर वाटचाल करत आहे. त्याचप्रमाणे 20 कॅरेट सोन्याची किंमत 38615 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याची किंमत 30119 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

3% जीएसटी वेगळा द्यावा लागेल
सोने खरेदी करण्यासाठी, तुम्हाला IBJA ने जारी केलेल्या दरावर स्वतंत्रपणे 3 टक्के जीएसटी भरावा लागेल. त्याचप्रमाणे, मंगळवारी IBJA वर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आणि ती 61967 रुपये प्रति किलोच्या पातळीवर गेली.

 

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर 999 लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिलेले असते. 18 कॅरेटवर 750 लिहिले असते तर 14 कॅरेटवर 585 लिहिलेले असते. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

 

Web Title :- Gold Price Today | gold silver price 10th may gold price in delhi aaj ka sone ka bhav gold mcx price

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा