Gold Price Today | दिवाळी-धनत्रयोदशीपूर्वी सोने स्वस्त, चांदीची चमक वाढली, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या (Silver) दरांमध्ये (Gold Price Today) बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली, तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. हा ट्रेंड भारतीय बाजारपेठेत देखील आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात 0.08 टक्क्यांनी घसरला. त्याचवेळी एमसीएक्सवर आज चांदीचा दर 0.05 टक्क्यांनी वाढला आहे. दिवाळी (Diwali) आणि धनत्रयोदशीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंना चांगली मागणी असते. मात्र, मागणी असली तरी सोन्याच्या दरात अद्याप वाढ झालेली नाही.

आज (बुधवार) वायदे बाजारात सकाळी 9 वाजता 24 कॅरेट सोन्याचा भाव 40 रुपयांनी घसरुन 50 हजार 374 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा भाव आज 50 हजार 397 रुपयांवर उघडला गेला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. चांदीचा दर आज 26 रुपयांनी वाढून 56 हजार 380 रुपये प्रिती किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरले, चांदी वधारली

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) थोडीशी घसरण झाली आहे. सोन्याच्या स्पॉट किमती आज 0.04 टक्क्यांनी घसरून 1,650.13 डॉलर प्रति औंस झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 0.34 टक्क्यांनी वाढून 18.72 डॉलर प्रति औंस झाली आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

या ठिकाणी करा तक्रार

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक ॲप तयार केले आहे.
BIS Care APP द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता.
या ॲपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता नाही तर त्याबाबत कोणतीही तक्रार करु शकता.
या ॲपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्यासंदर्भात तात्काळ तक्रार करु शकतात.

Web Title :- Gold Price Today | gold silver price today gold rate down today despite diwali dhanteras strong demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा