Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | देशातील बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. सोन्या-चांदीच्या दरामध्ये कालच (बुधवारी) घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता पुन्हा सोन्या-चांदीच्या भावात वाढ दिसून आली आहे. एमसीएक्सनुसार ऑगस्टमध्ये डिलिव्हरीसाठीचे सोन्याचे दर (Gold Price Today) 287 रुपयांच्या वाढीसह 47864 रुपयांवर पोहचले होते. तसेच, ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने 256 रुपयांनी वाढून 47970 रुपयांवर आणि डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी सोने 353 रुपयांनी वाढून 48283 च्या पातळीवर पोहचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) सोन्याचा भाव (Gold Price) प्रति औंस 1,815.10 पर्यंत होता. तर,15.40 डॉलरची तेजी होती. त्याचप्रमाणे आज चांदीचे दर वाढताना दिसत आहेत. यावेळी चांदी 0.431 च्या तेजीसह 25.308 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर पोहचला होता. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये (बुधवारी) सोन्याचा दरात 61 रुपयाची किंचित घट होऊन 46,607 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर झाला. तर चांदी (Silver Price) 1,094 रुपयांनी घसरून 64,779 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (MCX) नुसार चांदीच्या डिलिव्हरीमध्ये (Silver price today) देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावेळी सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 891 रुपयांच्या वाढीसह 67281 रुपये प्रति किलोवर पोहचला होता.
तसेच, चांदीची किंमत डिलिव्हरीसाठी 960 रुपयांनी वाढून 68114 रुपये प्रतिकिलोवर पोहचला होता.

या दरम्यान, सोन्याची अनिवार्य हॉलमार्किंग (Hallmarking) प्रक्रिया 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने सुरू झालीय.
तेव्हापासून ज्वेलर्स, सराफा व्यापाऱ्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
‘सराफा केंद्रांकडून हॉलमार्क केलेले दागिने मिळण्यास उशीर
आणि वस्तूंवर आयडी प्रणालीची अंमलबजावणी यासह सोन्याचे वस्तू खराब होण्यासारख्या समस्या सराफा व्यापाऱ्यांना येत आहेत.
28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 256 जिल्हे सोन्याच्या हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्यात निवड झाली.
सोन्याचे हॉलमार्किंग मौल्यवान धातूच्या शुद्धतेचा पुरावा आहे. आतापर्यंत ते ऐच्छिक होते.
असे अखिल भारतीय रत्न आणि ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (GJC) सांगितलं आहे.

Web Title :- Gold Price Today | gold silver price today gold silver surges today price rises to around rs 1000 check it out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा